बुलबुल हा चिमणीपेक्षा मोठा व साळुंकीपेक्षा लहान असून त्याची लांबी सु. २० सेंमी. असते. डोके आणि गळा हे भाग तकतकीत काळ्या रंगाचे असून शरीर आणि पंख फिकट तपकिरी असतात. पंख, पाठ आणि छातीवरील पिसांच्या कडा पांढऱ्या असल्यामुळे शरीरावर खवले असल्याचा भास होतो. पोटाकडचा आणि पाठीचा मागचा भाग पांढरा असतो.
बुलबुल या पक्षाची चोच काळी असते आणि त्याचे डोके सुद्धा काळे रंगाचे असते त्याची शेपूट तपकिरी रंगाची असते बुलबुल या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.
बुलबुल हे पक्षी मध्यम आकाराचे आणि थव्याने राहणारे पक्षी आहेत हे पक्षी खूपच गोंगाट करणारे असतात मुख्य बुलबुल हे पक्षी फिक्या रंगाचे लांब आणि हिरव्या पिसांचा पक्षी आहेत. या पक्षाची चोच लहान किंवा मध्यम आकाराचे असते आणि थोडीशी बाकदार असते. त्याचे पाय खूपच लहान असतात त्याचे पंख लहान व गोल असतात.
बुलबुलची मुख्य प्रजाती आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आढळते.काळ्या शेंडीचा बुलबुल हा गोवा राज्याचा राज्य पक्षी आहे.बुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. सहसा या पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत दडविलेले असते. बुलबुल एकावेळी २ ते ५ अंडी देतात. बहुतेक सर्व जातीत अंडी उबविणे, पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.बुलबुल या पक्षाचे खाद्य प्रामुख्याने हा पक्षी झाडावरची फळे छोटे कीटक मध हे बुलबुलचे मुख्य अन्न आहे किंवा खाद्य आहे.खुले वन व झुडपे असणाऱ्या माळरानात, शेतात आणि मनुष्यवस्तीच्या जवळपास झाडाझुडपांवर बुलबुल आढळतो. बहुधा तो जोडीने वावरतो. फळे, फुलांच्या पाकळ्या, मकरंद आणि कीटक हे त्याचे भक्ष्य आहे. वडाची व पिंपळाची पिकलेली लाल फळे खाण्यासाठी आणि शेवरीच्या फुलातील मकरंद पिण्यासाठी त्या झाडांवर बुलबुलांचे थवे जमतात.सर्वसाधारणपणे बुलबुल या पक्ष्यांचा प्रजनन काळ जून ते सप्टेंबर हा असतो निरनिराळ्या प्रदेशांमध्ये तो पुढे-मागे सुद्धा होऊ शकतो.बुलबुल हे पक्षी जोमदार आवाजात गाणारे म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच हे पक्षी मोठ्या प्रमाणात पाळले जातात.
No comments:
Post a Comment